खासदार क्रीडा चषक 2023 कॅरम स्पर्धेत ॲडव्होकेट शिवानी सुरकार प्रथम,यशाचे श्रेय कॅरम गुरु विशाल रामटेके व बादशाह सलीम यांना
वर्धा प्रतिनिधी(गणेश हिवरे):-दि.६ मार्च रोजी खासदार सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव 2023 मध्ये झालेल्या कॅरम स्पर्धेत तृतीयपंथी वकील शिवानी सुरकार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तसेच गार्गी मंथनवार यांनी द्वितीय तर सृष्टी रामटेके यांनी खुल्या कॅरम गटात तृतीय क्रमांक पटकावला.एडवोकेट शिवानी सुरकार यांनी आपल्या यशाचे श्रेय कॅरम गुरु विशाल रामटेके तसेच बादशाह सलीम यांना दिले.तृतीयपंथी केवळ शिक्षणातच अग्रेसर नसून क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर असल्याचे जिवंत उदाहरण आज शिवानीने प्रस्थापित केले.वर्धेतूनपहिल्यांदाच कुठल्यातरी तृतीयपंथीने क्रीडा क्षेत्रात नाव उंचविले आहे.या अगोदरही शिवानीने कॅरमच्या स्पर्धा जिंकलेल्या आहे.तृतीयपंथी समूहातील व्यक्तींनी शिक्षणाकडे तसेच क्रीडा क्षेत्रात लक्ष देणे काळाची गरज असल्याची शिवानीने सांगितले.शिवानी चे गुरु विशाल रामटेके यांनी फिनिशिंग मूवज,प्रॉपर रिबॉन्ड तर बादशाह सलीम यांनी ग्लास व डबल शॉट बद्दल प्रशिक्षण दिले त्याकरिता शिवानीने त्यांचे आभार मानलेले आहे.