गोमांस विक्री करणा-यांवर कोतवाली पोलीसांची कारवाई;दोघांवर गुन्हे दाखल
अहमदनगर प्रतिनिधी (दि.६ मार्च):-गोमांस विक्री करणा-यांवर कोतवाली पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे.दि.५ मार्च रोजी सकाळी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की,अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातील कारी मशिदीजवळ व सुभेदार गल्ली येथे गोवंशिय जनावरांच्या मांसाची विक्री केली जात आहे,अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोसई/मनोज कचरे हे त्यांचे पथकासह झेंडीगेट परिसरातील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर दोन्ही ठिकाणी मांस विक्री करणारे इसमांच्या समोर लहान मोठे आकाराचे मांसाचे तुकडे लटकवलेले दिसले पथकाची खात्री होताच तेथे छापा टाकुन सदर दोन्ही ठिकाणी इसमास ताब्यात घेवून त्याना त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्याचे नाव १) साहेल जावेद कुरेशी वय-२६ वर्षे रा.व्यापारी मोहल्ला झेंडीगेट अहमदनगर २)शहेबाज गुलामसाबीर सय्यद वय १९ वर्ष रा.ब्यापारी मोहल्ला झेंडीगेट अहमदनगर असे असल्याचे सांगीतले त्यांचे पत्र्याचे टपरीची झडती घेतली असता तेथे सदर ठिकाणी १,१०,०००/-रु किंमतीचे लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावरांचे मांसाचे तुकडे सुमारे ५५० किलो वजनाचे गोमांस, दोन सत्तुर व दोन वजनकाटे असा एकुन १,११,०००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून त्याचे विरुध्द कोतवाली पोस्टे १)गुरनं २१५/२०२३ २) गुरनं २१६/२०२३ भादंवि कलम २६९, महाराष्ट्र प्राणी सरंक्षण(सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(अ),(क),९(अ) प्रमाणे २ वेगवेगळे गुन्हे रजि दाखल करण्यात आले आहेत.सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोहेकॉ/ रायचंद पालवे व पोना/परवेझ इनामदार हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, पोसई/मनोज कचरे,पोहेकॉ/गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे,पोना/रियाज इनामदार,पोना/योगेश खामकर,पोकॉ/संदिप थोरात,पोकॉ/कैलास शिरसाठ,पोकॉ/सोमनाथ राऊत,पोकॉ/अमोल गाढे, पोकॉ/सुजय हिवाळे,पोकॉ/सागर मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.