Maharashtra247

मुस्लीम समाजाचा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मूक मोर्चा;जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.६ मार्च):-दि.५ मार्च रोजी नटराज हॉटेल महेश टॉकीज जवळ अमन शेख नामक युवकावर जीवघेणा हल्ला करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली.अमनला करण्यात आलेल्या मारहाणीच्या आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आली.तसेच या मागणी बरोबरच रामवाडी भागात झालेल्या वादामध्ये उपस्थिती नसतांना देखील जाणीवपूर्वक नावे गोवण्यात आली आहे.त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवीणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.दरम्यान शहरातील कोठला फलटणचौकी पासुन पोलिस अधीक्षक कार्यालयावर हा मूक मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page