या रंगपंचमीला हे गाणं वेड लावणार…
नगर प्रतिनिधी(दि.११ मार्च):- ‘रंगांनी भिजूया.. थेंबांनी थिजूया,आली रंगपंचमी.. रंगात न्हाऊया!’, या गाण्याने सध्या यूट्युबवर धिंगाणा घातला आहे.या गाण्याची निर्मिती आणि गीतकार आहेत,अहमदनगरमधील कवी नेत्रतज्ञ डाॅ.अर्जुन आनंद शिरसाठ! उद्या रंगपंचमी साजरी हाेत आहे.सर्वत्र उत्साह आहे.या पार्श्वभूमीवर हे गाणं रिलीज झालं आहे. गाणं यूट्युबवर येताच युवकांनी त्याला पंसती दिली आहे.कवी नेत्रतज्ञ डाॅ. अर्जुन आनंद शिरसाठ म्हणाले, रंगपंचमी हा उत्साह वाढविणारा सण आहे.रंगातून सकारात्मक ऊर्जा मिळते. ताेच धागा पकडून या गाण्याचा निर्मिती करण्यात झाली.अहमदनगर, पुणे, नाशिक आणि मुंबईतील कलाकरांनी एकत्र येत या गाण्याचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.यूट्युबवर अपलाेड करताच युवकांनी या गाण्याला पसंती दिली आहे. काही युवकांनी संपर्क साधून गाण्याच्या बाेलाचे काैतुक देखील केलं आहे.सकारात्मक ऊर्जा देणारी अशीच आणखी काही गाणे लवकरच प्रदर्शित हाेतील,असेही डाॅ.अर्जुन आनंद शिरसाठ यांनी सांगितले.हे गाणं प्रसिद्ध गायक तथा झी-सारेगम फेम मंगेश बाेरगावकर यांनी गायलं आहे.अभिनेत्री ऋतुजा लिमये,भूषण वेताळ यांच्यावर गाण्याचं चित्रीकरण झालं असून,त्यांनीही त्यांच्या अभिनयाने गाण्याला न्याय दिला आहे.अमाेल घाटे यांनी संगीत दिग्दर्शन,ऋतुराज काेरे यांनी संयाेजन,गाण्याच्या चित्रीकरणाचं दिग्दर्शन जयेश पवार आणि फाेटाेग्राफी दिग्दर्शन द्वारेश कस्तुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याची माहिती डाॅ.अर्जुन आनंद शिरसाठी यांनी दिली.गाणं https://www.youtube.com/watch?v=pIiE5I7rIJ0 या लिंकवर पाहता आणि ऐकता येणार आहे.