जिल्ह्यातील “बाप” कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल
संगमनेर प्रतिनिधी (दि.५.डिसेंबर):-विविध शाखांचे शिक्षण देणार्या संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील बाप सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या तीन कर्मचार्यांविरुद्ध विद्यार्थ्याला धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘बाप’ कंपनीला विद्यापीठाची मान्यता नसल्याची माहिती समजल्याने या संस्थेत शिक्षण घेणार्या हनुमान गरजे विद्यार्थ्याने विद्यापीठाला मेल करून संस्थेला विद्यापीठाची मान्यता आहे किंवा नाही,या संस्थेला पैसे घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे संतापलेल्या बाप कंपनीच्या कर्मचार्यांनी हनुमान याचा मानसिक छळ केल्यामुळे हा विद्यार्थी बेशुद्ध झाला होता.या विद्यार्थ्याला त्वरित उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.या ठिकाणी पोलिसांनी या विद्यार्थ्यांचा जबाब घेतला. यानंतर या विद्यार्थ्याने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या फिर्यादी त्याने म्हटले आहे की,आपण पारेगाव खुर्द येथील बाप कंपनीत बी.सी.ए चे प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.बाप कंपनीत अॅडमीशन घेतांना प्रा.रावसाहेब रामनाथ घुगे व सहप्राध्यापक दिपक नामदेव नागरे यांनी मला शिक्षण पूर्ण झाल्यावर म्हैसूर विद्यापीठाचे प्रमाणपत्र व नोकरी लावण्याचे एक बॉड पेपरवर लिहून देण्याची हमी दिली.यानंतर मी व माझे दाजी सुदाम गिते यांनी या कंपनीमध्ये अॅडमिशन पोटी साठ हजार रुपये दि.20/8/2022 रोजी भरले. त्यानंतर दिनांक 27/8/2022 पासुन नियमितपणे कॉलेजला जाबु लागलो.त्यांनतर दि. 3/11/2022 रोजी प्राध्यापक रावसाहेब घुगे यांना माझ्या नावाचा 100 रुपयांचा कोरा कोरा स्टॅम्प पेपर देवुन त्यांनी मला अॅडमिशन घेतेवेळी दिलेल्या आश्वसनाची लेखी स्वरुपात मागणी केली.प्राध्यापकांनी तो कोरा स्टॅम्प स्वताजवळ घेऊन मी नंतर देतो असे त्यांनी मला सांगितले.त्यानंतर मी प्राध्यापक यांचकडे वेळोवेळी लेखी स्टॅम्पची मागणी केली असता त्यांनी मला कुठल्याही प्रकारे दाद दिली नाही. म्हणुन मी पुणे म्हैसुर विद्यापीठ यांच्याकडे आर.टी.आय च्या माध्यमातून बाप कंपनी ही त्यांच्या अधिपत्याखाली आहे काय याबाबत ईमेल करून विचारपुस केली. बाप कंपनी ही त्यांच्या अधिपत्याखाली नसल्याचे मला माहिती आली. मी बाप कंपनीचा आर. टी.आय माध्यमातुन विचारणा केल्याने काल दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्राध्यापक रावसाहेब घुगे व उपप्राध्यापक दिपक नागरे यांनी त्याच्या कॅबीनमध्ये बोलवून घेतले.त्या ठिकाणी कंपनीचे कर्मचारी ऋतुजा पुरी (पुर्ण नाव माहित नाही),सुषमा आव्हाड व श्रीकांत डुबे हजर होते. तु ई-मेल कोणाच्या सांगणेवरून पाठविला, तुला कोण सपोर्ट करतो असे विचारले.मी आजारी असुन तुमच्या प्रश्नांची नंतर उत्तरे देतो असे मी त्यांनी सांगितले. त्यावर ते चौघेजण मला आज तु मेला तरी तुला जावु देणार नाही व तुला पोलिसांच्या ताब्यात देऊन तुझ्यावर गुन्हा दखल करु अशी त्यांनी धमकी दिली. त्यावर मी त्यांना मला घरी जावु द्या, अशी विनंती केली तरी देखील ते मला धमकी देत होते हा सर्व प्रकार त्यांनी मोबाईलवर कॅमेरा मध्ये रेकॉर्ड केला आहे, असे या फिर्यादीत म्हटले आहेे. या फिर्यादीवरून पोलिसांनी बाप कंपनीचे रावसाहेब रामनाथ घुगे, श्रीकांत डुबे, ऋतुजा पुरी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 342, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.