अहमदनगर प्रतिनिधी(दि.१६ मार्च):-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील सर्व समाज मंदिरांची रंगरंगोटी करून जिथे जिथे समाज मंदिराची पडझड झालेली आहे त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना माजी नगरसेवक अजय साळवे,अशोक पारधे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली.नीलक्रांती चौक,सिद्धार्थ नगर,माळीवाडा,नागापूर सावेडी,केडगाव,कौलारू कॅम्प,सर्जेपुरा,मंगलगेट, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा होत असतो.त्यामुळे तेथील स्थानिक आंबेडकरी जनता समाज मंदिरामध्ये जयंती साजरी करत असून बऱ्याच वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने समाज मंदिरांचे डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आलेली नसून येणाऱ्या 14 एप्रिल पूर्वी शहरातील समाज मंदिरांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.की ज्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आणखीन मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्यात येईल असे माजी नगरसेवक अजय साळवे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
