जोपर्यंत महामार्गांचे प्रत्यक्ष काम सुरू होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूच-आ.निलेश लंके
अहमदनगर प्रतिनिधी (दि.7.डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यातील नगर-पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या रखडलेल्या कामावरून आक्रमक झाले आहे.निलेश लंके यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.अहमदनगर -पाथर्डी,अहमदनगर-कोपरगाव यांसह जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांची कामे अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत.त्यामुळे निलेश लंके यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.निलेश लंके यांच्या उपोषणाला विविध संघटना अन पक्षांनी पाठिंबा दिला आहे.जोपर्यंत प्रत्यक्ष कामला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा आमदार निलेश लंके यांनी दिला आहे.यावेळी माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे,माजी आमदार दादाभाऊ कळमकर, घनश्याम आण्णा शेलार,शेवगावचे युवा नेते क्षितिज घुले,ऋषिकेश ढाकणे,बाळासाहेब हराळ, ॲड.हरिहर गर्जे,शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे,विक्रम राठोड आदी उपस्थित होते.