Maharashtra247

गुटखा बाहेर थुंकून ये म्हटल्याचा राग येऊन डॉक्टरला केली बेदम मारहाण ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना

शेवगाव प्रतिनिधी/प्रवीण भिसे (दि.७.डिसेंबर):-तोंडातील गुटखा बाहेर थुंकुन ये असे म्हटल्याचा राग येवून डॉक्टरला मारहाण व शिवीगाळ करण्यात आली असून तसेच डॉक्टरच्या केबिनमधील खुर्च्या व टेबलवरील कागदपत्रे फेकून दिली.ही घटना ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवार दि.७ डिसेंबर रोजी दुपारी  १.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात शासकीय कामांत अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेतील आरोपीचे नाव बलभिम मुरलीधर पठाडे (वय ४४,रा.अमरापूर, ता.शेवगाव) असे आहे.याप्रकरणी ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुशिलकुमार सुरेश बडे (वय ३४,रा.ढोरजळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी बलभिम मुरलीधर पठाडे (वय ४४,रा.अमरापूर,ता.शेवगाव) याच्या विरोधात भादंविक ३५३,३३२,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page