अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन ढंपरसह मुद्देमाल जप्त
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन ढंपरसह मुद्देमाल जप्त
अहमदनगर प्रतिनिधी (दि.7.डिसेंबर):-कोरडगांव ते पाथर्डी अवैध वाळु वाहतुक करणारे वाहनाविरुध्द कारवाई करुन आठ ब्रास वाळु व दोन ढंपर असा एकुण 20,80,000/- रु.किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.या बातमीची हकिगत अशी की श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द विशेष मोहिमेचे आयोजन करुन कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे,पोसई/सोपान गोरे,सफौ/मनोजर शेजवळ,पोहेकॅ/दत्तात्रय हिंगडे,बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी, संतोष लोढे,पोना/सचिन आडबल,विशाल दळवी, संदीप दरदंले,पोना/ज्ञानेश्वर शिंदे,पोकॉ/शिवाजी ढाकणे, विनोद मासाळकर,रविंद्र घुंगासे,मच्छिंद्र बर्डे,सागर ससाणे,जालिंदर माने,रोहित येमुल,योगेश सातपुते, चापोहेकॉ/भागचंद बेरड व अर्जुन बडे असे पाथर्डी तालुक्यात अवैध वाळु उत्खनन व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,दोन ढंपरमध्ये चोरुन वाळु भरुन कोरडगांव कडुन पाथर्डीकडे वाहतुक करणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली.पोनि/अनिल कटके यांनी नमुद माहिती लागलीच पथकास कळवुन पाथर्डी पोलीस स्टेशन अंमलदार व पंचांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या.नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार पाथर्डी ते कोरडगांव रोडने जावुन तनपुरवाडी शिवारात मोहटादेवी फाटा येथे रोडवर सापळ लावुन थांबलेले असतांना पथकास कोरडगांवकडुन एकामागे एक असे दोन ढंपर पाथर्डीकडे येतांना दिसले.पथकाची खात्री होताच ढंपर चालकास बॅटरीचे उजेडाने थांबण्याचा इशारा केला.दोन्ही ढंपर चालकांनी ताब्यातील वाहन रस्त्याचे कडेला उभी केली त्यावेळी दोन्ही चालकांना पोलीस पथकाची ओळख सांगुन ढंपरची पंचा समक्ष पाहणी केली असता ढंपरमध्ये वाळु भरलेली दिसली.ढंपर चालकांकडे वाळु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे दिली. पथकाने त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी त्यांचेकडे शासनाचा वाळु उत्खनन/उपसा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे पथकाने त्यांना ताब्यात घेतले.ढंपर क्रमांक 1 मधील ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)विजय अशोक चेमटे वय 32,रा.शिंगोरी थाटेवडगांव रोड,ता.शेवगांव, 2) गजेंद्र रघुनाथ भराट वय 19,रा.तोंडोळी,ता.पाथर्डी असे सांगितले त्यांचेकडे ढंपर मालका बाबत चौकशी करता त्यांनी 3) केशव रुस्तुम चेमटे रा.शिंगोरी,ता.शेवगांव याचे मालकीचा ढंपर असले बाबत कळविले.तसेच ढंपर क्रमांक 2 मधील ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 4) तौफिक नदीम शेख वय 26, रा. मुंगी, ता. शेवगांव असे सांगितले. त्यांचेकडे ढंपर मालका बाबत चौकशी करता त्यांनी 5) सुधीर संभाजी शिरसाठ याचे मालकीचा ढंपर असले बाबत कळविले.ताब्यात घेतलेल्या तिन आरोपींनी दोनही ढंपर मालकांचे संगनमताने अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळु अवैध उत्खनन व चोरी करुन पर्यावरणाचे नुकसान होईल असे कृत्य केल्याने तिन आरोपींना 20,80,000/- (वीस लाख ऐशी हजार) रु. किंमतीचे दोन टाटा कंपनीचे पांढ-या रंगाचे ढंपर व आठब्रास वाळुसह ताब्यात घेवुन दोन फरार ढंपर मालकासह एकुण पाच (05) आरोपी विरुध्द पोकॉ/शिवाजी अशोक ढाकणे,ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1169/2022 भादविक 379, 34 सह पर्यावरण कायदा कलम 3, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे विजय अशोक चेमटे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर व बीड जिल्ह्यात चार (04) गुन्हे दाखल असुन त्यांची माहिती खालील प्रमाणे-
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. पाथर्डी 110/2017 भादविक 379, 109
2. शेवगांव 375/2021 भादविक 326, 324, 504, 506, 34
3. चकलांबा, जिल्हा बीड 155/2019 खान उत्खनन कायदा कलम 21 (4)
4. पाथर्डी 1169/2022 भादविक 379, 34 प.का.क. 3, 15
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.