एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शनने वायरमनला रंगेहात पकडले
राहता प्रतिनिधी (दि.३० नोव्हेंबर):-राजुरी येथे नव्याने बेकरी सुरु करण्यासाठी व्यावसायीक वीज जोडणी घेतलेली असताना. सदर वीज जोडणी साठी आवश्यक असलेले नवीन विद्युत मीटर साठी अधिकृत कोटेशन व शुल्क भरूनही . ते मीटर लावुन देणे करिता यातील आरोपी धनंजय गोरख आगरे याने तक्रारदार यांचे कडे २०००/- ₹ लाचेची मागणी केल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून पडताळणी करण्यात आली असती सदर पडताळणी कारवाई दरम्यान पंचा समक्ष आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचेकडे २०००/- रुपये ची लाच मागणी करुन तडजोड अंती १०००/- लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम आरोपी लोकसेवक याने आज रोजी राजुरी येथे आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष रक्कम स्वीकारली असता त्यांस रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लोणी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सापळा अधिकारी : हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर. सहा.सापळा अधिकारी :-शरद गोर्डे,पोलीस निरीक्षक ला प्र वि अहमदनगर
सापळा पथक:- महिला पोलीस नाईक राधा खेमनर, पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड, चालक पो हवालदार हरुन शेख,
मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
*@ टोल फ्रि क्रं. १०६४*