शहर सहकारी बँक व मर्चंट बँकेच्या निवडणुका 20 डिसेंबर नंतर
नगर प्रतिनिधी (दि.१ डिसेंबर):-राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका राज्य सरकारने पुढे ढकलल्या आहेत.या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील २१ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात शहर सहकारी बँक,मर्चंट्स बॅंक यांचा देखील समावेश आहे.अहमदनगर जिल्ह्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गात २१ सहकारी संस्था येतात.यातील शहर सहकारी बॅंकेची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.उमेदवारांना चिन्ह देखील वाटप करण्यात आले आहे.या बॅंकेसाठी ११ डिसेंबरला मतदान हाेणार आहे.मर्चंट्स बॅंकेसाठी मतदारांची प्रारूप यादी देखील जाहीर झाली आहे.इतर संस्थांच्या निवडणुका देखील हाेत आहे.यातच शासनाचे आदेश आल्याने २० डिसेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.