
संगमनेर प्रतिनिधी:-संगमनेर शहरात अनोख्या पद्धतीने गोमांस तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.गोवंश जनावरांची कत्तल करत चारचाकी वाहनात अंड्यांच्या ट्रे खाली लपवून गोमांस तस्करी करण्यात येत होती. गस्तीवर असलेल्या संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने ही वाहने पकडले. सोमवारी (दि. १०) रात्री ११:५५ च्या सुमारास शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे- नाशिक महामार्गावर घुलेवाडी गावच्या शिवारात कारवाई करत दोघांविरुद्ध मंगळवारी दुपारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत एक लाख ४० हजार रुपये किमतीचे ७०० किलो गोमांस, चार हजार ८०० रुपये अंड्यांचे दोन लाख रुपयांचे चारचाकी वाहन (एमएच १७, बीवाय ६१४०) असा एकूण तीन लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.इंजमाम आयाज शेख (वय २४, रा. मदिनानगर, संगमनेर), ऋषिकेश मच्छिंद्र भोसले (वय २०, रा. अलकानगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिस कॉस्टेबल विवेक दत्तू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव,पोलिस उपनिरीक्षक फराहनाज पटेल आदींनी ही कारवाई केली. पोलिस नाईक धनंजय महाले पुढील तपास करीत आहेत.

