
अहमदनगर प्रतिनिधी दि.११ एप्रिल):-बौद्ध संस्कार संघाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त गुलमोहर रोडवरील आम्रपाली गार्डन मंगल कार्यालय येथे सुमधुर भीम गीतांची भिम पहाट हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.या भीमपहाट कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा संगीत सितारे विनय, रोहिणी,विजय,हे कलाकार भीमगीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत.भीमपहाट या कार्यक्रमाचे यंदा १५ वे वर्ष असून हा कार्यक्रम १४ एप्रिल रोजी पहाटे ५.०० वा आम्रपाली गार्डन मंगल कार्यालय येथे आयोजित केलेला आहे.तरी सर्व उपासक व उपासीकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक भाऊसाहेब देठे व बौद्ध संस्कार संघ आणि परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
