अहमदनगर प्रतिनिधी(दि.११ एप्रिल):-बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षकास प्रवासा दरम्यान मारहाण करणारा अटक,गुन्ह्यात वापरलेली सेलेरीओ कार जप्त एमआयडीसी पोलिसांची कामगिरी,दि.28/03/23 रोजी बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश प्रल्हाद शिरेकर हे नगर तालुक्यातील शेंडी येथे त्यांचे कुटुंबीयांसोबत थांबले असताना अज्ञात 02 इसमानी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या पायावर मोठा दगड टाकून गंभीर जखमी केले होते.त्यामधे त्यांचे दोन्ही पायांची हाडे फ्रॅक्चर झालेली होती.सदर बाबत एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गुरन 254/23 भादवि कलम 325,323,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर अज्ञात इसमाचा तपास सुरू असताना सदर इसम आरोपी नामे संकेत बाजीराव ससे हा पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाले वरून त्यास पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे.त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू असून पोलीस शोध घेत आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गर्शनाखाली सपोनि/राजेंद्र सानप,पोलीस उपनरीक्षक/योगेश चाहेर,पोहेकॉ/नंदकुमार सांगळे,पोकॉ/सुरेश सानप,पोकॉ/नवनाथ दहिफळे यांनी केलेली आहे.
