अहमदनगर प्रतिनिधी (दि.११ एप्रिल):-तीन वर्षापासून गंभीर गुन्हयात फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात कोतवाली पोलीसांना यश आले आहे.बातमीतील सविस्तर माहिती अशी की फिर्यादी नामे सौ.प्रिया आकाश डाके(वय.२२ वर्षे धंदा घरकाम रा.भारत बेकरीच्याजवळ बोल्हेगांव अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर होवुन फिर्याद दिली की,दिनांक २०/१०/२०२० रोजी रात्री ८.०० वाजण्याचे सुमारास फिर्यादी व फिर्यादीचा पती यांचे माळीवाडा वेस ते मार्केटयार्ड चौक जाणारे रोडवर वादविवाद सुरु असतांना आरोपी नामे १) विजय सुरेश गायकवाड २) आनंद एकनाथ सकट रा. साठे वसाहत माळीवाडा अहमदनगर ३)अभिषेक प्रभाकर साठे रा.साठे वसाहत माळीवाडा अहमदनगर ४) संतोष नामदेव उमाप रा. विदया कॉलनी अरणगांवरोड अहमदनगर यांनी फिर्यादीचे पतीस शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादीमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेली असता त्यांनी तिलाही शिवीगाळ, मारहाण करून फिर्यादीचा हात पकडुन तीची छाती दाबुन तीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तसेच फिर्यादीचे डोक्यात डावे बाजुला काहीतरी मारुन तिला जखमी करुन तीचा समोरील बाजुचा एक दात पाडला आहे.वगैरे मजकुरच्या फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ६०९३/२०२० भादंवि कलम ३२६,३२५,३५४,३२३,५०४, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी नामे संतोष नामदेव उमाप रा. विदया कॉलनी अरणगावरोड अहमदनगर हा गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता.दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमी मिळाली की,सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे संतोष नामदेव उमाप हा माळीवाडयात त्याचे पाहुण्यांचे घरी येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पोनि/चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी सदर ठिकाणी सापळा लावून शिताफीने त्यास पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव. संतोष नामदेव उमाप (वय ४२ वर्षे रा.मेजर अरुण वैदय कॉलनी, भिंगार,अहमदनगर) असे असल्याचे सांगीतले त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंघाने विचारपुस करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली.असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, पोसई/मनोज कचरे,पोलीस अंमलदार तनवीर शेख,गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर,संदिप थोरात,अमोल गाढे,सुजय हिवाळे,कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत,सागर मिसाळ यांनी केली आहे.

