अहमदनगर प्रतिनिधी(दि.१२ एप्रिल):-जमीनीच्या वादात आपल्याला अनेक वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या संतोष गायधने याने १ मे २०२३ रोजी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णा हजारेंना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी संतोष गायधनेला अटक केली असून त्याच्यावर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव गावात राहणारा संतोष गायधने हा तरूण शेतकरी गेल्या पाच वर्षापासून आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरोधात लढत आहे.शेतीच्या वादातून गावातील लोकांनी कुटूंबावर मानसिक आणी शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप संतोष गायधने याने केला होता.दरम्यान समाजसेवक अण्णा हजारेंना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल सांगितलं मात्र या प्रकरणात अण्णा हजारे यांनी दखल न घेतल्याचा आरोप संतोष गायधने याने केलाय त्यामुळे जर माझ्या मागणीची पोलीस प्रशासनाने दखल घेतली नाही तर अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करणार असल्याचा इशारा संतोष गायधने याने दिला होता.पोलिसांनी या धमकीची दखल घेत संतोष गायधनेला अटक केली आहे. श्रीरामपूर पोलिसांनी गायधनेला अटक करून त्याच्यावर जीवे ठार मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.

