प्रतिनिधी (दि.१३ एप्रिल):-श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे 40 वर्षीय व्यक्तीचा गळा दाबून खुन केल्याचे उघडकीस आले आहे,याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने निपाणी वडगाव गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दि.4 एप्रिल 2023 रोजी रात्री 11 ते दि.5 एप्रिल 2023 रोजी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास निपाणी वडगाव येथील संतोष उर्फ शेखर महादू पवार (वय 40) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.या प्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली होती.परंतु येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैदकिय अधिकार्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर संतोष पवार याचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले.सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून अज्ञान व्यक्ती विरुद्ध भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

