Maharashtra247

तब्बल दोन हजार किलो गोमांस जप्त कोतवाली  पोनि.चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची  कारवाई

 

नगर प्रतिनिधी (दि.१९ एप्रिल):-दोन हजार किलो गोमांससह तब्बल सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. बातमीतील हकीकत आशिकी,दि.१७ एप्रिल रोजी रात्री कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातून काही गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले मांस भरुन एक पिकअप वाहन झेंडीगेट परिसरातून हॉटेल अशोका जवळुन बीएसएनएल ऑफीसच्या मार्ग जाणार आहे.अशी माहिती मिळाल्याने स्वतःपोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व गुन्हे शोधपथक यांनी बीएसएनएल ऑफीसच्या परिसरात सापळा लावला असता अशोका हॉटेलच्या दिशेने एक पांढ-या रंगाचा पिकअप हा संशयितरित्या येतांना दिसला त्यास पोलीस पथकाची चाहुल लागताच पोलीस पथकापासुन काही अंतरावर आल्यानंतर त्याने त्याचे ताब्यातील पिकअप गाडी रस्त्याचे कडेला सोडुन तेथून पळून गेला.पथकाने सदर गाडीची पाहणी केली असता सदर पिकअप गाडी मध्ये गोवंशीय जनावरांचे मांस दिसुन आले सदर पिकअप मध्ये ४,००,०००/-रु किमतीचे लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावरांचे मांसाचे तुकडे सुमारे २००० किलो वजनाचे गोमांस,व २,००,०००/- रु.किचा एक पांढ-या रंगाचा पिकअप असा एकुन ६,००,०००/- रु किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून १) गाडीवरील फरार चालक २) अब्दुल हक कुरेशी,रा झेंडीगेट,अहमदनगर याचे विरुध्द कोतवाली पोस्टे गुरनं ३७७/२०२३ भादंवि कलम २६९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५ (क) ९ (अ) प्रमाणे पोना/२२०० योगेश अशोक भिंगारदिवे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोना/अब्दुलकादर परवेज इनामदार हे करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, पोहेकॉ/तनवीर शेख,पोहेकॉ/ गणेश धोत्रे,पोहेकॉ/सतिष भांड,पोना/योगेश भिंगारदिवे, पोना/अब्दुलकादर इनामदार, संदिप थोरात,कैलास शिरसाठ,सोमनाथ राऊत, अमोल गाढे,सुजय हिवाळे,/सागर मिसाळ,अतुल काजळे, श्रीकांत खताडे,प्रशांत बोरुडे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page