Maharashtra247

पै.महेंद्र गायकवाड छत्रपती शिवराय केसरी स्पर्धेचा विजेता;३५ लाख रुपयांची मानाची गदा पटकाविली

 

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३ एप्रिल):-नगर शहरातील वाडियापार्क येथे आयोजित केलेल्या छत्रपती शिवराय केसरी स्पर्धेच्या अंतिम कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली.चाललेल्या या कुस्ती दरम्यान शिवराज राक्षेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने पंचांनी पै.महेंद्र गायकवाड याला विजेता घोषित केले.गायकवाड याला ३५ लाख रुपयांची मानाची गदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खासदार सुजय विखे पाटील,आमदार प्रा.राम शिंदे,आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.या कुस्तीकडे अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमिंचे लक्ष लागून होते.अखेर या कुस्तीत पै.महेंद्र गायकवाड विजयी झाला.

You cannot copy content of this page