पारनेर शहराचे वैभव ठरेल असे २ कोटी रुपयांचे अद्यावत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बनविणार आ.निलेश लंके;तालुक्याचे भुषण ठरणाऱ्या स्मारकाच्या भव्य वास्तुची लवकरच होणार प्रत्यक्ष कामाला सुरुवात
पारनेर प्रतिनिधी(दि.२२ एप्रिल):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत सालाबाद प्रमाणे पारनेर शहरामध्ये मोठ्या उत्साहात महामानवाची जयंती पार पडली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत पारनेर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.पारनेर शहरातील सर्व पक्षीय मान्यवर मंडळींनी या महामानवास अभिवादन करत सदर जयंती मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.राष्ट्रवादीचे पारनेर शहरातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब नगरे यांनी आमदार निलेश लंके हे आमदार झाल्या बरोबर पहिले एक काम सांगितले होते ते म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला साजेशी व संपुर्ण तालुक्यातील माहामानवाच्या क्रांतीकारी विचारांची देवान घेवान करता येईल व संविधानाचा प्रचार प्रसार व अभ्यास करता येईल आसे , अद्ययावत व सुसज्ज अशी वास्तू व भव्य असे बाबासाहेब स्मारक पारनेर शहरात उभे करावे आसे सुचित केले . त्यांच्या विनंतीस मान देऊन आमदार लंके यांनी लगेच शब्द दिला व या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुसज्ज अशा आंबेडकर स्मारकास मंजुरी देत,आर्थिक वर्षे सन 2023-24 चा पारनेर नगर पंचायतचा दलीत सुधार योजने अंतर्गत 60 लक्ष व आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातुन 01 कोटी 40 लक्ष आसे एकुन 02 कोटी रुपये भरीव निधी उपलब्ध करत लवकरच डॉ.आंबेडकर स्मारकाचे काम प्रत्यक्षरित्या चालु होईल आसे प्रभाग क्र . नऊच्या नगरसेविका हिमानी नगरे यांनी आमदार लंके यांच्या आदेशाने जाहीर केले.पारनेर शहराचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजय औटी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत मंगळवारी आमदार लंके यांच्या माध्यमातुन 07 कोटी रुपयाचे विकास कामांचे भुमीपुजन पारनेर शहरात करण्यात आले.त्यात नगरसेवीका हिमानी नगरे यांच्या प्रयत्नातुन प्रभाग क्र.नऊ मध्येही 15 लक्ष रुपयांचा विकास कामांचा शुभारंभही आ.लंके यांच्या हस्ते करण्यात आला.शुक्रवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आमदार निलेश लंके यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देऊन या महामानवाला पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या प्रत्यक्षरित्या नारळ वाढवून शुभारंभ केला व थोड्याच दिवसात सुसज्ज असे आंबेडकर स्मारक उभारणीस प्रत्यक्ष सुरुवात होईल असे जाहीर केले. पारनेर नगर पंचायतचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व नगरसेवक व समस्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सव कमीटीचा मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात अनेक समाज प्रबोधनकार,विचारवंत , राज्यघटनेचे अभ्यासक , पारनेर शहरातील विवीध क्षेत्रातील व पक्षातील मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला व प्रबोधनपर मार्गदर्शन केले.सायंकाळी पाच वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत सर्व धर्मीय बांधवांच्या उपस्थित पारनेर शहरातून पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली व फटाक्यांच्या अतिषबाजीत रात्री आठ वाजता मिरवणुकीत आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत आंबेडकर स्मारकाचा नारळ वाढवून सदर मिरवणूकीचे विसर्जन करन्यात आले.तद्नंतर मिरवणुकीत सहभाग नोंदवणाऱ्या बांधवांना यावेळी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली.