Maharashtra247

अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द एलसीबीच्या तीन ठिकाणी कारवाया तब्बल ३३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ एप्रिल):-श्रीरामपूर तालुका,शेवगांव व मिरजगांव येथील अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द तीन ठिकाणी कारवाई करुन चार ट्रॅक्टर,तीन ट्रॉली,एक ढंपर, एक मोबाईल फोन व सहा ब्रास वाळु असा एकुण 33,70,000/- (तेहतीस लाख सत्तर हजार) रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी,पोना/संदीप दरंदले, पोना/सचिन आडबल, विशाल गवांदे,पोकॉ/रणजीत जाधव,शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ,मयुर गायकवाड,सागर ससाणे, रोहित येमुल,आकाश काळे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमून अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकाने श्रीरामपूर तालुका, शेवगांव व मिरजगांव पोलीस स्टेशन हद्यीत कारवाई करुन अवैधरित्या वाळु चोरी व वाहतुक करणारे 03 ठिकाणी छापे टाकुन एकुण 33,70,000/- (तेहतीस लाख सत्तर हजार) रुपये किंमतीचे चार ट्रॅक्टर, तीन ट्रॉली,एक ढंपर,एक मोबाईल फोन व सहा ब्रास वाळु असा मुद्देमाल जप्त करुन खालील प्रमाणे 07 आरोपीं विरुध्द श्रीरामपूर तालुका,शेवगांव व मिरजगांव पोलीस स्टेशन येथे भादविक सह पर्यावरण कायदा कलमान्वये एकुण-03 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ते खालील प्रमाणे

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम आरोपीचे नाव व पत्ता जप्त मुद्देमाल

1)श्रीरामपूर तालुका 191/2023 भादविक 379, 34 सह पकाक. 3/15 1) अर्शद शेख,रा.खानापुर,ता. श्रीरामपूर

2)सुनिल मोरे

3)सर्फराज अजगरअली सय्यद

4) बाळासाहेब जाधव

5) कलिम पठाण अ.क्र. 2 ते 5 सर्व रा.भामाठाण,ता. श्रीरामपूर 18,30,000/- तीन ट्रॅक्टर,तीन ट्रॅली,एक रेडमी कंपनीचा मोबाईल व दोन ब्रास वाळु

2)शेवगांव 359/2023 भादविक 379, 34 1) लक्ष्मण शामराव शिंदे

2)तुकाराम मच्छिंद्र विखे, दोन्ही रा.सोनविहीर,ता. शेवगांव 10,40,000/- एक विना नंबर पांढरे रंगाचा ढंपर व चार ब्रास वाळु

3)मिरजगांव 105/2023 भादविक 379 1)एक लाल रंगाचा स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर वरील अज्ञात चालक 5,00,000/- लाल रंगाचा स्वराज ट्रॅक्टर

एकुण 07 आरोपी 33,70,000/- (तेहतीस लाख सत्तर हजार) रुपये रुपये किंमतीचे चार ट्रॅक्टर, तीन ट्रॉली,एक ढंपर,एक मोबाईल फोन,सहा ब्रास वाळु

सदर कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर,श्रीमती. स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री.संदीप मिटके साहेब,उपविभागीय पोलीस अधीकारी,श्रीरामपूर विभाग,अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग व श्री. आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page