Maharashtra247

जुगार अड्ड्यावर भिंगार पोलिसांचा छापा पाच जणांवर गुन्हा दाखल

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.२२ एप्रिल):-तिरट जुगार खेळणाऱ्या ५ जणांवर भिंगार कॅम्प पोलीसांनी केली कारवाई,दि.२१ एप्रिल रोजी सहा.पोलीस निरीक्षक श्री. दिनकर एस.मुंडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,नगर सोलापुर रोड कोंबडीवाला मळा,येथे काही इसम झाडाखाली उघड्यावर तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळत आहे.अशी बातमी मिळाल्याने श्री.दिनकर एस.मुंडे यांनी पोलीस अंमलदारांना सदर ठिकाणी जावून कारवाई करणे कामी आदेश दिल्याने पोलीस स्टाफ व पंच अशांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी १)अजय रमेश ननवरे,वय 50 वर्ष रा.कोंबडीवाला मळा,नगर सोलापुर रोड,ता.जि. अहमदनगर २)भाऊसाहेब देवराम वाघुले वय 63 वर्षे रा.जिल्हा परीषद शाळेजवळ,नागरदेवळे ता.जि.अहमदनगर ३)पवित्रम नानू नायर वय 67 वर्ष रा.कोंबडीवाला मळा,नगर सोलापुर रोड, ता.जि. अहमदनगर ४)अशोक मोहन साबळे वय 36 वर्षे रा.कोंबडीवाला मळा,नगर सोलापुर रोड,ता.जि.अहमदनगर ५) राजु बबन गजभिव रा.कोंबडीवाला मळा,नगर सोलापुर रोड,ता.जि.अहमदनगर (फरार) असे तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना मिळून आले.त्यांचे ताब्यातून रोख रक्कम,मोबाईल,मो सा अशा प्रकारचा एकून 70,310 रू किंचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांचे विरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशात खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अजित पाटील यांचे मार्गदर्शना खाली सपोनी/दिनकर मुंडे,पोहेकाँ/760 अजय नगरे,पोहेकाँ/2644 बिभीषन दिवटे,पोना/2178 राहुल द्वारके,पोना/1407 भानूदास खेडकर,पोकाँ/810 अमोल आव्हाड यांनी सदरची कारवाई केली.सदर गुन्हाचा तपास पोना/2178 राहुल द्वारके हे करीत आहे.

You cannot copy content of this page