माळीवाडा परिसरात धारदार सुरा हातात घेवून दहशत करणारा कोतवाली पोलीसांकडून अटक;हत्यार कायद्यान्वये दोन महिन्यात कोतवालीची पाचवी कारवाई
अहमदनगर प्रतिनिधी(दि.१ मे)दि.३० एप्रिल रोजी रात्री कोतवाली पोलीसांना बातमी मिळाली की,माळीवाडा वेशीजवळील लक्ष्मीआई मंदीराचे जवळ एक इसम त्याचे हातात धारदार सुरा घेवून लोकांमध्ये मोठमोठ्याने आरडाओरड करुन दहशत निर्माण करत आहे अशी बातमी मिळाल्याने पोनि/चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना तात्काळ सदर ठिकाणी रवाना केले असता तेथे एक इसम त्याचे हातात धारदार सुरा घेवून मोठमोठ्याने आरडाओरड करत असल्याचे निदर्शनास आल्याने तपास पथकातील अंमलदारांनी त्यास शितीफिने ताब्यात घेवुन त्याचे कडील लोखंडी धारदार सुरा जागीच जप्त करुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव वैभव अनिल घोरपडे(वय १९ वर्ष रा.बुरुडगल्ली,अहमदनगर) असे असल्याचे सांगीतले त्यास ताब्यात घेतले व त्याचे विरुध्द पोकॉ/सुजय हिवाळे यांनी कोतवाली पोलीस ठाणे मध्ये फिर्याद दिली.त्या आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४१९/ २०२३ भारतीय शस्त्र अधिनियम ४/२५ सह क्रिमीनल लॉ अमेंटमेंट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोनि/चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नितीन शिंदे हे करत आहेत.घोरपडे इसमासोबत दारू पिऊन मारहाण करणारे प्रसाद दिलीप भापकर वय 23 वर्ष आणि अमोल दिलीप भापकर वय 26 वर्ष दोन्ही राहणार माळीवाडा पारिजात हॉटेल मागे अहमदनगर यांच्यावर सुद्धा मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.मागील दोन महिन्यात कोतवाली पोलिसांकडून हत्यार बाळगणे व वापर करणाऱ्यांवर एकूण पाच कारवाया करण्यात आलेल्या आहेत.यापुढेही कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे,पोलीस जवान योगेश भिंगारदिवे, सुजय हिवाळे,कैलास शिरसाट,संदीप थोरात,तनवीर शेख,अमोल गाडे,नितीन शिंदे, अशोक भांड,नितीन धायगुडे यांनी केली आहे.