आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा घेणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जेरबंद
अहमदनगर प्रतिनिधी(दि.१ मे):-आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) मोबाईलवरुन शेवगाव तालुक्यातील आखेगांव येथील घेणा-यास इसमास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून,त्याच्याकडून १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई ३० एप्रिल रोजी केली आहे.भागनाथ ऊर्फ सदा विठोबा खरचंद (वय ३७,रा. आखेगांव,ता.शेवगांव) असे बेटिंग घेणाऱ्याचे नाव आहे.पोना/ संतोष शंकर लोंढे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३७५/२०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,व श्रीरामपूर व अतिरिक्त प्रभार शेवगांव डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/संतोष लोढे,पोना/सचिन आडबल,पोकॉ/ रोहित मिसाळ,शिवाजी ढाकणे,जालिंदर माने यांनी केली आहे.