अहमदनगर प्रतिनिधी:-नगर मनमाड रोड लगत कांकरिया मोटर्सच्या जागेमध्ये बांधकाम चालू आहे.परंतु हे बांधकाम चालू असताना या ठिकाणी कामासाठी मोठे क्रेन आणले आहे व हे क्रेन पूर्णपणे फिरते असून त्यावर सिमेंटचे ब्लॉक आहेत व ते ब्लॉक वा क्रेन फिरते असून ते रोडवर कधीही पडू शकते.त्यामुळे रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना याने गंभीर इजा होऊन नागरिक जखमी होऊ शकतात.व मोठमोठ्या शहरांमध्ये अशा मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडल्या आहेत.त्यामुळे आधीच खबरदारी म्हणून ते क्रेन तात्काळ काढून टाकायला हवे,बांधकामाला क्रेन वापरायची परवानगी दिली कशी? आणि दिली नसल्यास त्याच्यावर कारवाई करणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळणे बंद होणार का? महानगरपालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड,अक्षय बोरुडे,सोमा शिंदे,संघराज गायकवाड इ.उपस्थित होते.

