अहमदनगर प्रतिनिधी (दि.३० एप्रिल):-महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याकरिता वाळूचे उत्खनन,साठवणूक व ऑनलाइन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा एक क्रांतिकारी असा निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाइन प्रणालीचे लोकार्पण दि. १ मे २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात नायगाव येथे महसूलमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.तरी या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
