१७ वर्षीय युवतीचा पेवर ब्लॉक डोक्यात मारत हत्या
शिर्डी प्रतिनिधी(दि.३ मे):-शिर्डीतील सैंदडी बाबा रोडवर असलेल्या मयुरेश्वर कॉलनी येथील रहिवाशी ज्ञानेश्वरी नवनाथ कुलथे या 17 वर्षीय युवतीचा पेवर ब्लॉक डोक्यात मारत हत्या झाल्याची घटना मंगळवारी दि.२ मे रोजी सायंकाळी शिर्डीत घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे अशी माहिती समजते.शिर्डी येथील ज्ञानेश्वरी कुलथे या युवतीचा मंगळवारी सायंकाळी हत्या झाल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस शिर्डी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेची माहिती घेतली.या तरुणीच्या डोक्यात पेवर ब्लॉक मारून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना समजताच युवतीची हत्या कशामुळे झाली असावी याचा तपास पोलिसांनी वेगाने करून याप्रकरणी एका युवकाला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.भरवस्तीत 17 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.परंतु ही हत्या कोणत्या कारणाने केली याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.