स्व.बाळासाहेब लांडे पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट जुन्या आठवणींना दिला उजाळा
अहमदनगर प्रतिनिधी (दि.३ मे):-श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राचे १ मे कामगार दिना दिवशी राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या प्रसंगी विखे पाटील येथे आले असता त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब लांडे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.व कै.मा.खासदार बाळासाहेब विखे पाटील व बाळासाहेब लांडे पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यांनी कै.बाळासाहेब लांडे पाटील यांना आदरांजली वाहिली.मंत्री विखे पाटील यांचे मोठ्या उत्साहात लांडे पाटील परिवाराकडून स्वागत व औक्षण करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पठारे,माजी सभापती नानासाहेब पवार,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरदराव नवले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने व ग्रामस्थ उपस्थित होते.