प्रतिनिधी(दि.३ मे):-सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तसेच मनसे महिला जिल्हाध्यक्षा पद्मिनीताई वारे यांची भोई समाज महिला प्रदेश कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.वारे यांचे समाजकार्य नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे.त्यांनी मनसेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे.लोकांच्या हाकेला धावून जाणाऱ्या ताई अशी त्यांची नाशिक जिल्ह्यात ओळख आहे त्याचीच पावती म्हणून त्यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी पदी नियुक्ती झाली आहे.भोई समाज क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश लोणारे,अर्जुन भोई प्रदेश महासचिव,राहुल हरसुले प्रभारी प्रदेशाध्यक्ष तसेच महिला प्रदेशाध्यक्ष अलका घाटे यांच्या सहीनिशी सौ.पद्मिनीताई प्रवीण वारे यांना हे नियुक्तीपत्र दि.३ मे रोजी देण्यात आले आहे.
