श्रीरामपूर प्रतिनिधी(देि.३ मे):-मुलगी अल्पवयीन असताना वधू-वर पित्याने पुजारी,आचारी फोटोवाले, मंगल कार्यालय आणि १०० ते १५० नातेवाईक,मित्र परिवार अशा सर्वांना साखरपुड्याचा कार्यक्रम घेणार असल्याचे खोटे सांगून त्यांच्या परस्पर साखरपुड्याच्या कार्यक्रमात बालविवाह लावून दिला.ही घटना १४ डिसेंबर २०२२ रोजी अशोक नगर (ता . श्रीरामपूर ) येथील लक्ष्मी ऍग्रो टुरिझम हॉलिडे हॉल्स येथे घडली आहे.याबाबतची माहिती ही उडान टीमला समजली होती.उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्तीसाठी सुरू आहे.बालविवाह या विषयाची जनजागृती ही संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहे.यामुळे या प्रकरणाची माहिती जागरूक नागरिकांनी कळवली.ही माहिती ५ महिन्यानंतर उघडकीस आली. हे उघडकीस आल्यानंतर सुद्धा पूर्ण एक महिनाभर उडान टीमने पाठपुरावा केल्यानंतर या प्रकरणाचा गुन्हा दाखल होऊन अखेर निकाल लागला.२ मे रोजी ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली आहे.मुलीचे आणि मुलाचे आधी प्रेम प्रकरण असल्याने त्याचबरोबर मुलीने आपल्या जिवाचे काही करू नये याचा विचार करून मुलीच्या आई-वडिलांनी त्या मुलासोबत तिचे विवाह करून देण्याचे ठरवले.१४ डिसेंबर २०२२ रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम ठरवून शंभर ते दीडशे नातेवाईकांना बोलवण्यात आले.यामध्ये कोणालाच असे माहिती नव्हते की,हे लग्न आहे. अचानक मुलाचा आणि मुलीच्या पालकांनी ठरवले की आपण साखरपुड्यातच लग्न करून घेऊ आणि साखरपुड्यातच या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला. लग्नानंतर तिने दहावीची परीक्षा अशोकनगरच्या शाळेतून दिली ती गळ्यात मंगळसूत्र घालूनच दहावीतील या मुलीचे लग्न झाल्याची माहिती शाळेत होती.पण बालसंरक्षण समितीचे सदस्य असलेल्या मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व इतरांनी याबाबत कोणतीही हालचाल केली नाही.ती मंगळसूत्र आणि डोक्याला सिंदूर लावून शाळेत जात असेल तरीसुद्धा शिक्षकांना लक्षात आलं नाही की तिचा विवाह झाला आहे. यावरून लक्षात येते की शिक्षकांना सुद्धा या बालविवाह बदल गंभीर्यता नाही.चक्क पाच महिन्यानंतर गावातील जागरूक नागरिकांनी याबाबत तक्रार उडान टीमला आणि चाईल्ड लाईनच्या मोफत क्रमांक १०९८ वर माहिती दिली. तेव्हा तिथून पुढे या प्रकरणात हालचाली सुरू झाल्या.उडान टीमने ताबडतोब संबंधित ग्रामसेवकांना या गोष्टीची माहिती दिली.या माहितीवरून संबंधित ग्रामसेवक यांनी त्या मुलीचा विवाह अल्पवयीन वयात झाल्याबाबत त्या मुलीच्या वयाची शाळेतून बोनाफाईड सर्टिफिकेट द्वारे मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री केली.त्यानंतर मुलीचे लग्न झाले आहे.याबाबत पुरावे गोळ्या करण्यास सुरुवात केली.पण या ग्रामसेवकांना आरोग्य विषयक अडचणी निर्माण झाल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.उडान टीमने कोणत्याही प्रकारची वाट किंवा विलंब न करता श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी दुसऱ्या ग्रामसेवकांची नेमणूक करावी याबाबत विनंती केली. त्यांनीही यावर गांभीर्यता दाखवून दुसरे ग्रामसेवकांची नेमणूक केली.तोपर्यंत या प्रकरणाला माहिती मिळून दोन आठवडे होऊन गेले होते. तरीसुद्धा या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.यामुळे वारंवार उडान टीमने पाठपुरवठा सुरू ठेवला. त्यामध्ये ज्या लोकांनी माहिती दिली त्यांचाही पाठपुरवठा सुरूच होता.दुसऱ्या ग्रामसेवकांनी आल्यानंतर जिथे काम थांबले होते,तिथून त्यांनी काम सुरू केले.त्यांनी अनेकांकडे जाऊन परावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. पण सुरुवातीला याबाबत कोणीही त्यांना सहकार्य केले नाही.यामुळे उडान टीम कडून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे सहकार्य व मदत मागितली.यावेळी बालकल्याण समितीच्या सदस्या अँड.अनुराधा येवले यांनी पोलिसांना फोन लावून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी विनंती सुद्धा केली.यामुळे पोलीस यंत्रणेकडून खूप मोठ्या प्रमाणात मदत आणि सहकार्य मिळाले.पोलीस यंत्रणांचा सहभाग झाल्यामुळे या प्रकरणास गती आली.ज्या ज्या लोकांनी हजर राहून या बालविवाहामध्ये सहकार्य केले आणि मदत केली अशा सर्वांनी त्यांचे स्टेटमेंट आणि लग्न झाल्याचे पुरावे उपलब्ध करून दिले.आता मुलीचे वयाची अल्पवयीन असल्याची खात्री सुद्धा झाली आणि लग्न झाल्याचे पुरावे सुद्धा उपलब्ध झाले.पण यामध्ये फिर्यादी होणार कोण? असे ग्रामसेवक आणि पोलिस यंत्राने पुढे प्रश्न उभे राहिले. या यंत्रणांचा सतत उडान टीमशी समन्वय असल्याने ही सुद्धा अडचण दूर झाली. उडान टीमने त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ आणि शासनाचे अधिसूचना २०१३ बदल माहिती सागितले की, ग्रामीण भागामध्ये जर बालविवाह झाला तर त्या बालविवाह झाल्याचे पुरावे गोळा करण्यापासून तर फिर्याद देण्यात पर्यंत ग्रामसेवक यांची नेमणूक केली आहे. यामुळे सरकारतर्फे फिर्याद ग्रामसेवक यांनीच दिली पाहिजे.फिर्याद कशी द्यायची यामध्ये कोणत्या प्रकारचे शब्दरचना असायला हवी.याबाबत सुद्धा उडान टीमने ग्रामसेवक आणि पोलीस यंत्रणा मार्गदर्शन केले. शेवटी २ मे रोजी बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार कलम ९,१०,११ याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला.यामध्ये पतीसह,मुलीचे आई वडील, सासू सासरे,आणि हजर राहून सहयोग देणारे,मदत करणारे, उपस्थित असणारे अशा १०० ते १५० नातेवाईक मित्रपरिवार आणि हजर असणाऱ्यां अशा सर्व वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
