पारनेर प्रतिनिधी(दि.५ मे):-नाशिक विभागीय आयुक्तांनी पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांची मानसिक आरोग्य तपासणी करुन शेतकऱ्यांची वेळोवेळी होत असलेली अवहेलाना थांबुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई होण्यासाठी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व सहकाऱ्यांनी महसुलचे नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व उपायुक्त संजय काटकर यांना निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही अनेकवेळा शेतकऱ्यांचे शिवपाणंद,शेतरस्ते पाझर तलाव दुरुस्तीचे प्रश्न शासन दरबारी मांडले.प्रश्न सुटेना म्हणुन आम्ही शेतकरी पारनेरचे तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांना भेटायला गेल्यावर व त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना ते आमच्या अंगावर मारायला येत होते.अत्यंत खालच्या स्तराच्या अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडून वेडे झालेल्या व्यक्ती सारखे ते वागत होते.सदरील अधिकाऱ्यांचे वर्तन हे नेहमीच वेडे झालेल्या व्यक्ती सारखे असते.त्यांना कुणी भेटायला गेले तरी ते त्या व्यक्तींच्या अंगावर शिव्या देत मारायला आल्यासारखे वर्तन करतात असा पारनेरकरांचा अनुभव आहे.सदरील अधिकाऱ्यांचे वर्तन हे नेहमीच वेडे झालेल्या व्यक्ती सारखे असते.त्यामुळे आमच्या तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तहसीलदार साहेब त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा वेडे झालेल्या व्यक्तीसारखे नेहमीच बोलत असतात.त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.म्हणून तहसीलदार साहेबांची मानसिक आरोग्य तपासणी चांगल्या डॉक्टरांच्या टीम कडून करून घ्यावी व त्यांच्यावर ताबडतोब उपचार करावा असे आम्ही या निवेदनाद्वारे आपणास विनंती करत आहोत.आपण जर सदरील तहसीलदारांची मानसीक तपासणी न करता त्यांना तसेच मोकळे सोडले तर त्यांच्या वेडेपणामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागेल.शेतकऱ्यांसोबत वेडेपणाचे वर्तणूक केलेला व्हिडीओ सोबत पेनड्रायव्ह मध्ये जोडलेला आहे.हे सर्व तपासुन आपण त्यांच्या मानसिक आरोग्य तपासणीचे संबंधितास आदेश द्यावेत अशी आम्ही शेतकरी विनंती करत आहोत.सबंधित निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,थोर समाजसेवक अण्णा हजारे,मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हाधिकारी,अहमदनगर जिल्हाआरोग्य अधिकारी अहमदनगर,महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खासदार सुजयदादा विखे पाटील,आमदार निलेशजी लंके,आदींना दिल्या आहेत.तुम्ही दिलेले पत्र पुढील कार्यवाहीसाठी तात्काळ पाठविण्यात येवुन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्याचे आश्वासन महसुलचे नाशिक विभागीय उपायुक्त संजय काटकर यांनी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांना यावेळी दिले.
