प्रतिनिधी(दि.४ मे):-सामाजिक कार्यात आपल्या कामाने नेहमी ठसा उमठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या राधिकाताई घुमे यांची भोई समाज महिला क्रांती दलाच्या पुणे विभाग महिला अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.सौ.घुमे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून पुणे जिल्ह्यातील गोरगरीब, अनाथांना मदत मिळवून दिली.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची पुणे विभाग महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली.भोई समाज क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश लोणारे,अर्जुन भोई प्रदेश महासचिव,राहुल हरसुले प्रभारी प्रदेशाध्यक्ष तसेच महिला प्रदेशाध्यक्ष अलका घाटे यांच्या सहीनिशी सौ. राधिकाताई घुमे यांना हे नियुक्तीपत्र दि.४ मे रोजी देण्यात आले.
