अहमदनगर प्रतिनिधी(दि.१० मे):-अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराफ यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी तब्बल पाच महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात सकल हिंदू समाजातर्फे १४ डिसेंबर रोजी 2022 ला हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाला कालिपुत्र कालीचरण महाराज आणि गुजरातमधील काजलदीदी हिंदुस्थानी उपस्थित होते.यावेळी कालीचरण महाराज यांनी घरातील दिल्लीगेट येथे मोर्चानंतर झालेल्या सभेत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले होते.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये पोहेकॉ/अजय गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून कालीचरण महाराज यांच्या विरोधात 153 (अ) आणि 507(2) या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
