अहमदनगर प्रतिनिधी (दि.१० मे):-बीड जिल्ह्यातील केज तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत दि.६ मे २०२३ रोजी दाखल गुन्ह्यातील नराधम आरोपी सुशील संपत भांगे याने यवतमाळ जिल्ह्यातील मौजे बानायत ता.धारवा येथील ऊसतोड कामगार जयराव संपतराव आमटे या मातंग समाजातील कुटुंबाला ऊस तोडणीसाठी कर्नाटक येथे नेले होते.तेथे त्याने त्यांच्याकडून कारखान्याचा हंगाम संपेपर्यंत काम करून घेतले हंगाम संपल्यानंतर त्यांना घरी पाठविण्याऐवजी वाईट हेतूने त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरी न जाऊ देता आरोपीच्या डोका येथील स्वतःच्या शेतामध्ये काम करावयास नेले.तेथे त्याने त्यांच्याकडून शेतामधील सर्व कामे करून घेतले व जबरदस्तीने त्यांच्या गरिबीचा व दुबळेपणाचा फायदा घेऊन वारंवार त्यांच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने तिच्या मर्जी विरुद्ध अत्याचार केले.ही घटना तिने घरी सांगितल्यावर त्या नराधामाने तिला मारून विहिरीत टाकले या कृत्याचा दलित महासंघाच्या वतीने निषेध करून या घटनेतील आरोपी याला फाशीची शिक्षा करण्यात यावी,त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा,या घटनेचा तपास तात्काळ सीबीआय कडे वर्ग करावा अशी मागणी शेवगाव तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.लक्ष्मण बोरुडे,व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
