अहमदनगर प्रतिनिधी (दि.११ मे):-श्रीरामपूर तालुक्यातील संजय नगर येथे विक्री करण्याचे उद्देशाने दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुस अवैधरित्या कब्जात बाळगणारे दोन आरोपी 52,400/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.घटनेतील माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे बाळगणा-या विरुध्द कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असताना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, गावठी कट्टे व जिवंत काडतुस जवळ बाळगणारे दोन इसम श्रीरामपूर येथील संजयनगर परिसरात विक्री करण्यासाठी येणार आहेत.आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन पंचाना सोबत घेवुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.नमुद सुचना प्रमाणे पथकातील पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे, पोना/रविंद्र कर्डीले,पोना/सचिन आडबल,पोकॉ/रणजीत जाधव,सागर ससाणे व किशोर शिरसाठ अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी संजय नगर,वॉर्ड नं.2 श्रीरामपूर येथे जावून बर्फाचे कारखान्या जवळ सापळा लावुन थांबलेले असताना थोड्याच वेळात चार इसम संशयीतरित्या बोलताना दिसले.पोलीस पथकाची खात्री होताच लागलीच दोन संशयीत इसमांना ताब्यात घेतले व दोन इसम गर्दीचा फायदा घेवुन पळुन गेले. ताब्यात घेतलेल्या दोन संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)अक्षय राजु फुलारे,वय 25 व 2) शहेबाज युनूस पटेल,वय 30,दोन्ही रा. संजय नगर,वॉर्ड नं.2,ता. श्रीरामपूर असे असल्याचे सांगीतले.दोन्ही इसमांची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीत दोन (02) गावठी बनावटीचे कट्टे व आठ (08) जिवंत काडतूस असा एकूण 52,400/-रु. किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.पळुन गेलेल्या दोन्ही इसमांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 3) शहारुख युनूस पटेल,रा. संजयनगर,ता.श्रीरामपूर (फरार), 4) फिरोज इब्राहिम पठाण,रा.शनिचौक,वॉर्ड नं.2, ता.श्रीरामपूर (फरार) असे सांगितले.त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.ताब्यातील दोन्ही इसम संजयनगर,श्रीरामपूर परिसरात दोन (02) गावठीकट्टे व आठ (08) जिवंत काडतूस बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोकॉ/2514 रणजित पोपट जाधव,ने. स्थागुशा यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पो.स्टे. गु.र.नं.447/23 आर्म ऍ़क्ट 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे शहेबाज युनूस पटेल हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द विनयभंग,गंभीर दुखापत व इतर कलमान्वये तीन गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1)लोणी 262/22 भादविक 326, 354, 143, 147, 148, 149
2)श्रीरामपूर शहर 268/18 मजुकाक 12 (अ)
3)श्रीरामपूर शहर 112/21 मदाकाक 65 (ई) (फ)
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
