अहमदनगर प्रतिनिधी (दि.१०.डिसेंबर):-वरिष्ठांकडे तक्रारी केल्याच्या संशयातून तीन पोलिसांनी सहकारी पोलिस कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.अहमदनगर रेल्वेस्थानकात ही घटना घडली.या मारहाणीत रवींद्र भानुदास देशमुख (रा.सारसनगर,अहमदनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.रवींद्र देशमुख (रा.एकदंत कॉलनी, सारसनगर) हे सुमारे एक महिन्यापासून अहमदनगर येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. देशमुख हे मंगळवारी (ता.६) रात्री नऊ वाजता ड्युटीवर होते.त्यावेळेस सहकारी पोलिस कर्मचारी जगताप (बक्कल नंबर ५१७) याने काही कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. पोलिस हवालदार मनोज साळवे हातात लाकडी दांडके घेऊन आला.खासगी ड्रेसवर असलेला पोलिस कर्मचारी हर्षल तोरणे हा त्याठिकाणी आला.आमच्या तक्रारी वरिष्ठांना करतो का?असे म्हणून दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. तिघांनी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.या मारहाणीचे मोबाईलमध्ये शुटिंग करण्यास सुरूवात केल्यावर त्यांनी मोबाईल हिसकावून घेतला.या मारहाणीत डावे हाताचे बोटे आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.डाव्या हाताचे मनगट मोडले असून डाव्या हाताच्या बोटांना पाच टाके पडले आहेत.देशमुख यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी जगताप, मनोज साळवे,हर्षल तोरणे या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
