अहमदनगर प्रतिनिधी (दि.११ मे):-श्रीरामपूर परिसरात मोटार सायकलवर येवुन मोबाईल हिसकावणारे दोन आरोपींना 85,000/-रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व पल्सर मोटार सायकल अशा मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीतील हकिगत अशी घटनेतील फिर्यादी सौ. वैशाली चंद्रकांत गो-हे(वय 27,रा.इंदीरानगर,ता. श्रीरामपूर)या अशोकनगरकडे जात असताना पाठीमागुन येणारे विना नंबर पल्सर मोटार सायकलवरील अनोळखी दोन इसमांनी फिचा मोबाईल बळजबरीने हिसकावुन चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 29/22 भादविक 392,34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर,यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन ना उघड गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी,पोना/रविंद्र कर्डीले,पोकॉ/आकाश काळे, मयुर गायकवाड व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन ना उघड गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या. पथकातील पोलीस अंमलदार श्रीरामपूर परिसरात फिरुन मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असताना पोनि/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इमस नामे रामदास थोरात रा. भोकर,ता.श्रीरामपूर हा चोरीचे मोबाईल वापरतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने पथकाने तात्काळ इसम नामे रामदास थोरात रा.भोकर,ता. श्रीरामपूर याचे राहते घरी जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) रामदास लक्ष्मण थोरात वय 31,रा.भोकर,ता.श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीत काळे रंगाचा सॅमसंग कंपनीचा ए-51 मोबाईल फोन मिळुन आल्याने त्याबाबत विचारपुस करता त्याने सदर मोबाईल हा प्रकाश चाबुकस्वार,रा. भोकर,ता.श्रीरामपूर याचेकडुन विकत घेतल्याची माहिती दिल्याने त्यास त्याचे राहते घरा जवळुन एक लाल काळ्या रंगाचे बजाज पल्सर मोटार सायकलसह ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 2) प्रकाश रमेश चाबुकस्वार,वय 21,रा.भोकर,ता.श्रीरामपूर असे सांगितले.त्याचेकडे नमुद मोबाईल बाबत विचारपुस करता त्याने वर नमुद चोरीचा मोबाईल फोन त्याचे साथीदार नामे 3)ज्ञानेश्वर ऊर्फ आरुष गणपत शिडुते रा.घुलेवाडी,ता.संगमनेर (फरार) व 4) योगेश सिताराम पटेकर रा.वडाळा महादेव,ता.श्रीरामपूर (फरार) या दोघांनी विक्री करण्यासाठी दिले अशी कबुली दिल्याने आरोपींचा त्यांचे राहते घरी जावुन शोध घेतला असता ते मिळुन आलेले नाहीत.ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपीचे कब्जातुन गुन्ह्यात चोरीस गेलेला 10,000/- रुपये किंमतीचा काळे रंगाचा सॅमसंग कंपनीचा ए-51 व 75,000/- रुपये किंमतीची लाल काळ्या रंगाचे पल्सर मोटार सायकल असा एकुण 85,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे प्रकाश रमेश चाबुकस्वार हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग व गंभीर दुखापत करणे असे -02 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1)श्रीरामपूर शहर गु.र.नं. 4/2020 भादविक 324, 323, 504, 506, 427
2)श्रीरामपूर शहर गु.र.नं. 113/2021 भादविक 354, 504, 506, 34
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर व श्री. संजय सातव उविपोअ संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
