अहमदनगर प्रतिनिधी(दि.१५ मे):-अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या एकाच पोलीस स्टेशनला पाच वर्ष पूर्ण होऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांचा जिल्हा अंतर्गत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बदल्या केल्या आहे.त्या अनुषंगाने नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशन येथील 22 पोलीस अंमलदारांचा एक आगळावेगळा निरोप समारंभ करण्यात आला.या अंमलदारांचा फेटा घालून ऐतिहासिक चांदबिबी महाल येथे अनोख्या पद्धतीने निरोप समारंभ साजरा करण्यात आला.यावेळी नगर तालुका पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक रणजीत मराग व सर्व महिला व पुरुष पोलीस अंमलदार यावेळी उपस्थित होते.
