जामखेड प्रतिनिधी (दि.१५ मे):-अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील एका महिलेने ट्रक चालकाला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून प्रेमाच्या गप्पा मारून जाळ्यात ओढले.त्यास गुरुवारी (दि.११) जामखेड येथे बोलावून घेतले.तेथे महिलेच्या नातेवाइकांनी त्यास मारहाण करून अर्धनग्न फोटो काढून पैशाची मागणी करून डांबून ठेवले.त्या चालकाच्या पत्नीकडे ज्यादा पैशांची मागणी केली.तिने पोलिसांनी माहिती सांगितली. फोनच्या आधारे पोलिसांनीही त्या महिलेचा शोध घेऊन हनीट्रॅपचा पर्दाफाश केला. एका आरोपीस अटक केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अहमदपूर (जि.लातूर) तालुक्यातील एका गावातील ट्रक चालकाला जामखेड तालुक्यातील महिलेने फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली.त्याच्याशी प्रेमाच्या गप्पा मारत त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.त्यास जामखेड येथे बोलावून घरी नेले.त्याच वेळी महिलेचे नातेवाईक तेथे आले.त्यांनी ट्रक चालकाला लाठी-काठीने मारहाण केली.पैशाची मागणी केली,तसेच पैसे न दिल्याने जबरदस्तीने कपडे काढायला लावून त्या महिलेसोबत अर्धनग्न अवस्थेत जबरदस्तीने फोटो काढले,तसेच पैसे दिले नाही तर अत्याचाराची खोटी तक्रार नोंद करील,अशी धमकी दिली.त्यामुळे चालकाने घाबरून काही पैसे महिलेला दिले.परंतु महिला व तिच्या नातेवाइकांनी आणखी पैशांसाठी डांबून ठेवले. चालकाच्या पत्नीला फोन करून अधिकच्या पैशांची मागणी केली.त्याच्या पत्नीने ११२ नंबरवर कॉल केला. पोलिसांना चालकाच्या मोबाइल लोकेशनवरून त्याचा शोध लागला,असे फिर्यादीत म्हंटले आहे.पोलिसांनी सविस्तर चौकशी चालकाच्या तक्रारीवरून महिला व तिच्या नातेवाइकांविरुद्ध अन्यायाने कैदेत ठेवणे,खंडणी,दुखापतीचा गुन्हा नोंद केला आहे.एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून,इतर तिघांचा शोध घेत घेतला जात आहे.पोलिस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे,पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
