Maharashtra247

सामाजिक कार्यकर्त्या अंजली गायकवाड यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी करून अटक करावे नारीशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा शारदा भुजबळ यांची शिरूर पोलीस स्टेशन निरीक्षकांकडे मागणी

 

शिरूर प्रतिनिधी (दि.१५ मे):-नारी शक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. शारदा भुजबळ यांनी शिरूर पोलीस स्टेशनला दि.१५ मे रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,वरील गेल्या काही दिवसांपूर्वी शिरुर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली गायकवाड यांची आत्महत्या बाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.सदरच्या घटनेने संपूर्ण शहर हे तणाव पूर्वक होते.परंतु सदरची महिला ही सामाजिक कामात अग्रेसर होती परंतू त्यांनी आत्महत्या करते वेळी सहा पाणी सुसाईड नोट लिहिले असल्याचे समजते व त्यातच तिने तिचे आत्महत्येचे कारण देखिल सांगितले असल्याचे समजते.सदर घटनेच्या बाबत काही समाजकंटकांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी या घटनेचा दुरुपयोग करून खंडणी मागितल्याची घटना देखिल घडली आहे.याबाबत शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा ही दाखल करण्यात आल्याचे समजते.सदरच्या प्रकरणी मात्र त्या महिलेला न्याय मिळण्याचे राहीले बाजूला परंतू तीच्या आत्महत्येचे कारण पुढे करून त्याच्या गैरवापर जास्त होत असल्याचे चित्र दिसत आहे.सदरच्या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करून खरे आरोपी यांना शिक्षा होणे अपेक्षित असताना इथे मात्र “मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात” सगळे मग्न असल्याचे दिसते.सदरचा घडलेला प्रकार अत्यंत दुदैवी असून सदरच्या महिलेच्या आत्महत्येस कोण जबाबदार आहे हे शोधणे गरजेचे आहे तसेच त्या महिलेस न्याय मिळणे गरजेचे आहे.परंतु तसे न होता आपले पोलीस स्टेशनची कामगिरी देखिल याबाबात निराशाजनक आहे.सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर असून याच्या खोलात गेल्यास अनेक प्रकरणाचे गूढ दडलेले आहे. व यात अनेक गंभीर गुन्हे देखिल उघडकीस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.सदरच्या प्रकरणामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे व दडपणीचे वातावरण तयार झाले असून यावर मुख्य आरोपी यांना शासन होणे गरजेचे आहे तसेच सदरच्या सुसाइड नोट मधे आणखी कोणकोणत्या व्यक्तींची नावे निष्पन्न झाली आहेत ते शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या तसेच समाजासमोर येणे गरजेचे आहे.सदरच्या घटनेने सामाजिक वातावरण गढूळ झाले असून महिला वर्गामध्ये व समाजामध्ये देखील याबाबत उलट सुलट चर्चाना उधाण आलं आहे.तरी विनंती की,सदर घटनेचा लवकरात लवकर छडा लावून मुख्य आरोपी यांना शासन करावे,सुसाईड नोट मधे असणाऱ्या गोष्टींचा खुलासा करावा,सदरच्या महिलेस कोणी कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले त्यांचेवर तात्काळ गुन्हे दाखल करावे,समाजामध्ये दूषित झालेले वातावरण निवळण्याचे काम करावे, समाजामध्ये पोलीस यंत्रणेवर असणारा विश्वास कायम करावा,तसेच सदरच्या महिलेस न्याय मिळणेसाठी शर्तीचे प्रयत्न करावे असे विनंतीपूर्वक निवेदन नारीशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आले आहे.

You cannot copy content of this page