अहमदनगर प्रतिनिधी(दि.१६ मे):-अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्ष हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीच्या भिंगार कॅम्प पोलीसांनी आवळल्या मुसक्या,दि 16.मे रोजी दुपारी 3/0 वा.सुमा.सपोनि.श्री.दिनकर एस मुंडे यांना गोपनीय
बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,मा.उपविभागीय दंडाधिकारी सो,नगर भाग,अहमदनगर यांचे कडील आदेश क्रमांक हद्दपार प्रस्ताव क्र.31/2022 अहमदनगर दि.31/03/2023 अन्वये संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यामधून दोन वर्षाकरीता हद्दपार केले असताना त्याने सदर आदेशाचे उल्लंघन करून तो सैनिक नगर भागात आलेला आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मधील पथक रवाना होऊन सदर ठिकाणी जावून खात्री केली असता बातमीतील नमूद इसम हा सदर ठिकाणी
मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारचा त्याने त्याचे नाव शफीक अब्दुल रज्जाक
मोगल (वय 32 वर्षे रा. यशवंत नगर,डेअरी फार्म, सैनिक नगर,भिंगार ता.जि.अहमदनगर) असे
सांगीतल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर केले.सदर हद्दपार इसम मिळून आल्याने त्याचे विरूद्ध कॅम्प पोस्टे.गुरनं/289/2023 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्प पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,पोहेकाँ/46 रेवननाथ दहीफळे,पोना/2178 राहुल द्वारके,पोकाँ/810 अमोल आव्हाड,चापोकाँ/841 अरूण मोरे यांनी केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफौ/रमेश वराट हे करीत आहेत.
