अहमदनगर प्रतिनिधी:-लोणी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या राहता येथील सराईत पाच आरोपींच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद केलंय,पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पथकाने शिर्डी नगर रोड येथील निर्मळ पिंपरी येथे छापा टाकून आरोपींना पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले.अजय राजू भोसले,ऋतुंजय उर्फ अमोल अविनाश कुंदे,योगेश किशोर कांबळे,साईराम राजू गुडे व एक अल्पवयीन मुलगा याला ताब्यात घेतले व सतीश बाबासाहेब खरात हा अंधाराच फायदा घेऊन पसार झाला.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एक लोखंडी कोयता,एक चाकू,एक स्क्रू ड्रायव्हर,मिरची पूड पांढऱ्या रंगाची सुमो गाडी असा पाच लाख पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील व राज्यातील आणि गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोसई/तुषार धाकराव,मनोहर गोसावी,संदीप पवार,रवींद्र कर्डिले,फुरकान शेख,प्रशांत राठोड,संतोष खैरे,आकाश काळे,अमृत आढाव,संभाजी कोतकर यांनी केली.
