भिंगार कॅम्प पोलिसांची मोठी कारवाई लष्करामध्ये भरती होण्यासाठी बनावट कॉल लेटर देणारी आंतरराज्य टोळी जेरबंद;सैन्य दलातील अधिकारी असल्याचे भासवून गणवेश परिधान करून केली तोतयागिरी
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ मे):-लष्करामध्ये बनावट कॉल लेटर देऊन भरती करवून घेतो म्हणवून नागरिकांची फसवणूक करणारी आंतरराज्य सराईतांची टोळी जेरबंद करण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे.दि.23/05/2023 रोजी आरोपी नामे 1)आदर्श नांगेलाल कुशवाह वय 19 वर्षे रा.रात्योरा,पो.करपीया ता.कोरॉन.जि.प्रयागराज (उत्तर प्रदेश) 2)मोहीत कुमार माणीकलाल यादव वय 25 वर्षे रा.कासीमाबाद सारंगपुर पोस्ट दांडूपुर ता.करचना जि.प्रयागराज (उत्तरप्रदेश) 3) आनंद श्याम नारायण शर्मा वय 23 वर्षे रा.सडवाकला पीसी.गेट जवळ,पोस्ट टीएस एल ता.करचना जि.प्रयागराज (उत्तर प्रदेश) 4)अंशू राजेंद्र कुमार तेजपाल सिंग वय 25 वर्षे रा.मांझीगाव मरोका पोस्ट दांडी ता.करचना जि.प्रयागराज (उत्तर प्रदेश) यांनी A.R.O.मेरठ (उत्तरप्रदेश) यांचे नावाचे भारतीय सैन्य दलातील अग्निविरामध्ये भरती झाले बाबत ट्रेनिंग करण्यासाठी कोठून तरी बनावट कॉल लेटर बनवून ते बंद लिफाफ्यामध्ये सादर करून भारतीय सैन्य दलाची फसवणूक केली असून आरोपी नामे 5)लोकेश कुमार तेजापल सिंग वय 25 वर्षे रा.मिर्झापुर पोस्ट धनकोट ता.जि.गौतम बुद्ध नगर, (उत्तर प्रदेश) 6)गोपाळ रामकिसन चौधरी वय 20 वर्षे रा.सिखरणा पोस्ट.छरा ता.आतरोली जि.अलिगढ (उत्तर प्रदेश) आरोपी नं 5 व 6 यांनी आरोपी नं 1 ते 4 यांचे कडून 7,50,000/- रू.नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवून त्यांचे कडून पैसे घेऊन फसवनूक केलेली आहे.तसेच सदर गुन्हयातील आरोपी नं 05 हा भारतीय सैन्यदलातील जवान नसल्याचे माहीत असून देखील त्याने त्याचे अंगावर सैन्य दलातील अधिकारी गणवेश परीधान करून तोतयागीरी करून आरोपी नं 01 ते 04 यांना मी भारतीय सैनीक असल्याचे भासवून भारतीय सैन्य दलाची फसवूनक केले बाबत भिंगार कॅम्प पोस्टे गुरनं 303/2023 भादवि कलम 420,468,419, 171, 177,140,34 प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे.यातील आरोपी नं 01 ते 04 यांना यातील फिर्यादी व त्यांचे सोबत असलेले जवान यांनी पोस्टेला हजर केले.त्यानंतर भिंगार कॅम्प पोस्टे कडील अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून यातील आरोपी नं 05 व 06 यांना अहमदनगर शहरामधून ताब्यात घेतले असून आरोपी नं 01 ते 06 यांना मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपींना 05 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली असून गुन्ह्याचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,सहा.पोलिस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे, पोसई/मंगेश बेंडकोळी, पोसई/किरण साळुंके,सफौ/अकोलकर,पोहेकाँ/रेवननाथ दहीफळे,पोहेकाँ/गणेश नागरगोजे,पोहेकाँ/संदिप घोडके,पोहेकाँ/राठोड,पोहेकाँ/रघूनाथ कुलांगे,पोना/राहुल द्वारके,पोना/दिलीप शिंदे,पोकाँ/रमेश दरेकर,पोकाँ/संतोष टेकाळे, पोकाँ/अविनाश कराळे, पोकाँ/समीर शेख,चापोकाँ/अरूण मोरे,मपोकाँ/येणारे यांनी कारवाई केली आहे.