नगर प्रतिनिधी (दि.११ जुन):-विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना ध्येय निश्चित करून जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करीत आपले कर्तव्य सिद्ध करावे.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप देणे गरजेचे आहे त्या माध्यमातून त्यांना प्रेरणा व ऊर्जा मिळत असते उद्याचे भविष्य हे विद्यार्थी असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची खरी गरज आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर आपला देश बलशाली होईल शिक्षण क्षेत्रामध्ये विविध करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे तरी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळावे व आपले करिअर यशस्वी करावे,गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देखील केली जाईल त्याचे शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे थांबले जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ भारत देश हा विद्यार्थ्यांचा देश म्हणून ओळखला जात आहे,त्यांच्या जोरावर नक्कीच महासत्ता बनेल असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी संतोष साबळे,लतिका पवार,समीर पाटील,नितीन भगत,मल्हार देशपांडे,पुष्कर कुलकर्णी,शिवाजी आढाव, निलेश जाधव,अजिंक्य वाकळे,पल्लवी सोमानी,कुसुम सोनवणे,सचिन फाटक,राणी वाघ,संतोष राठोड आदी उपस्थित होते.संतोष साबळे म्हणाले की,माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अनेक वर्षापासून दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप दिली जाते हा उपक्रम कौतुकास्पद आहे.याचबरोबर वर्षभर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.वृंदा सोमानी व वेणू सोमानी या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय तायक्वंदो स्पर्धेमध्ये सुयश मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला असे ते म्हणाले.
