अहमदनगर प्रतिनिधी (दि.११ जुन):-पिक विम्याचे पैसे बॅकेतून काढून देतो म्हणून फसवणुक करुन सोने लंपास करणारा आरोपी अवघ्या चोवीस तासाच्या आत १,२०,०००/- रुपयेच्या सोन्याच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आहे. बातमीतील हकीकत अशी की,दि.५ जुन रोजी सकाळी ०९.०० वा.सुमारास यातील फिर्यादी सौ.सुलोचना सुभाष कातोरे (वय ५० वर्षे रा. कामरगाव ता.जि.नगर) हे त्यांच्या माहेरी भाळवणी ता.जिल्हा अहमदनगर येथे कार्यक्रमासाठी जाण्यासाठी कामरगावतील बसस्टॅण्डवर थांबली होत्या तेंव्हा तेथे एक अनोळखी इसम निळया रंगाच्या गाडीवर आला व मला म्हणला की मला भाळवणी येथे जायचे आहे असे सांगून माझ्यासोबत दहा मिनीट गप्पा मारत बसला आणि थोडयावेळाने तो तेथून निघून गेला त्यानंतर मी माझ्या गळयाला हात लावला असता माझ्या गळयातील सोन्याचे मन्याचे गंठण मला दिसून आले नाही त्यानंतर माझी खात्री झाली की,सदर इसमाने मला बोलण्यामध्ये गुंतवुण माझ्या गळयातील १२ ग्राम वजनाचे सोन्याचे गंठन माझ्या सहमतीशिवाय चोरुन घेवून गेला आहे.अशी फिर्याद नगर तालुका पोस्टे गुरंन ४८१/२०२३ भादवीक ३७९ प्रमाणे दाखल होती.त्यानंतर दि.२/५/२०२३ रोजी १०/३० वा.सुमा फर्यादी सौ.लता सुर्यकांत कार्ले (वय ६५ रा.जखणगाव ता.जि.अहमदनगर) व त्यांची सवत विजाबाई असे नगरला नातेवाईकांच्या लग्नासाठी जाण्यासाठी जखणगाव बसस्टॅण्डवर थांबले असता एक इसम मोटार सायकलवर येऊन आंम्हाला म्हणला की, अहमदनगर येणारी बस आज येणार नाही मी पण नगरला चाललो आहे तुम्हाल मी नगरला सोडतो असे सांगितलेने आंम्ही त्याच्या मोटार सायकलवर बसलो आणि नेप्ती गावच्या शिवारात आल्यावर त्यांनी माझी सवत विजाबाई यांस गाडीवरुन खाली उतरवले आणि मला पुढे नेऊन सांगितले की,मी तुमच्या मुलाचा मित्र आहे तुमचे पिक विम्याचे पैसे बँकेत आलेले आहेत व त्यासाठी आधी तुम्हाला काही पैसे दयावे लागतात त्यावेळी मी त्याला म्हणाले की माझा जवळ आता पैसे नाहीत त्यावर त्यांनी मला सांगितले की,तुमच्या गळयाती गंठण मला दया मी ते बॅकेत गहाण ठेवून तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणाल्यावरुन मी त्याला माझ्या गळयातील १० ग्राम वजनाचे १२० सोन्याचे मणी असलेले गंठण त्याला काढून दिले परंतु तो परत आला नाही त्यामुळे त्यांनी माझी फसवणुक केली आहे अशा मजुकराची फिर्याद नगर ता.गुरंन ४८५/२०२३ भादवी कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.त्या अनुशंगाने श्री.शिशिरकुमार देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक,नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी सदर गुन्हयाबाबत पोसई/रणजित मराग,पोसई/ युवराज चव्हाण,पोहेकॉ/नितीन शिंदे,मपोना/गायत्री धनवडे,पोकॉ/कमलेश पाथरुट,पोकॉ/संदीप जाधव,पोकॉ/बांगर व चापोहेकॉ/घोरपडे सर्व अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन दोन्ही गुन्हयातील आरोपी ताब्यात घेण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले.त्यानुसार सदर पथकातील अधिकारी व अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना श्री/ शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमी मिळाली की,सदर दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हा एकच आहे व तो सध्या कामरगावच्या बस स्टॅण्डवर थांबला आहे त्याला तात्काळ जावून ताब्यात घ्या अशा सुचना त्यांनी पथकाला दिल्याने सदर पथक कामरगाव बसस्टॅण्डवर जावून सापळा लावून थांबले असता तो तेथे मिळून आला त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्यांने त्याचे ज्ञानदेव हरीभाऊ चेंडे (वय ३७ वर्षे रा.पुणेवाडी ता.पारनेर जिल्हा अहमदनगर)असे असलेचे सांगितले त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये गुन्ह्यातील एकुण अंदाजे १,२०,०००/- रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल मिळून आला.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी केली आहे.
