अहमदनगर प्रतिनिधी(दि.११ जुन):-जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून दोन महिने फरार असलेल्या दोघा सख्या भावांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.१)राजू समशुद्दिन शेख २)अजीज समशुद्दीन शेख रा.थोटेवाडी,दूरगाव ता.कर्जत असे पकडलेल्या आरोपींचे नाव आहे.घटनेतील हकीकत अशिकी,७ एप्रिल रोजी कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करून मुलीचे दोन्ही हात पाय बांधून तोंडात रुमाल कोंबून या बंधूंनी बळजबरीने अत्याचार केला होता,व प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या आई व भावाला मारून टाकण्याची धमकी दिली होती.याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुरन 221/2023 भादविक 376, 376 (ड) 452,506 प्रमाणे राजू शेख व अजिज शेख यांच्या विरोधात पोक्सो कलमान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांचा शोध सुरू केला असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दोन्ही आरोपी दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला या ठिकाणी एका झोपडी मध्ये राहत असल्याची माहिती मिळाली त्या नुसार पोलीस पथकाने शेतमजूर म्हणून देशांतर करून दोन दिवस पळत ठेऊन या दोघांना ताब्यात घेतले या दोघांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सदरील गुन्हाचा तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दहा हजार रुपयांचे रिवार्ड घोषित केले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/बबन मखरे सुनील चव्हाण,अतुल लोटके, पोना/रवींद्र कर्डिले,भीमराज खर्से,फुरकान शेख,रोहित मिसाळ,भाऊसाहेब काळे,जालिंदर माने,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड,चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांनी केली आहे.
