कर्जत प्रतिनिधी (दि.११ जुन):-अहमदनगर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची समजली जाणारी कर्जत बाजार समिती निवडणुकीच्या आज झालेल्या मतदानात आ.प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टिने दणदणीत विजय मिळवत कर्जत बाजार समितीवर सत्ता मिळवली.कर्जत बाजार समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाचे काकासाहेब तापकीर हे सभापतीपदी तर,अभय पाटील यांची उपसभापती पदी निवड झाली.आ.रोहीत पवारांनी संपुर्ण ताकद पणाला लावुन निवडणुक लढवली होती पण कर्जतकरांनी आ.प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वालाच पसंती दिली.गेल्या महिनाभरात झालेल्या मोठ्या निवडणुकीत त्यामध्ये बाजार समितीच्या दोन आणि खर्डा ग्रामपंचायतीची एक अशा तीनही ठीकाणी कर्जत-जामखेडकरांनी आमदार शिंदेचे नेतृत्व स्विकारून भारतीय जनता पार्टिला यशस्वी केल आहे हेच चित्र सध्या दिसते आहे.
