नगर प्रतिनिधी(दि.२० जुन):-भिंगार छावणी परीषद हद्दीतील असलेल्या भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भिंगार छावणी परीषद हद्दीतील परीसरात असलेल्या शुक्रवार बाजारमध्ये दररोज भाजीपाला विक्रेते व छोटे मोठे व्यापारी बसत आहे,पूर्वीच्या काळापासून दर शुक्रवारी भिंगार शहरामध्ये आठवड्याचा मोठा बाजार भरत असल्यामुळे या मार्केटची ओळख आजपर्यंत फक्त शुक्रवार बाजार या नावानेच राहीली आहे.तरी या मार्केटला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे असे निवेदन छावणी परीषदचे office of superintet श्रीमती.परनाईक मॅडम यांना देण्यात आले.या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,वाल्मिकी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तालेवार गोहेर,लोक फिरस्ता न्यूज चॅनलचे प्रतिनिधी प्रशांत पाटोळे,सामाजिक कार्यकर्ते विशाल भैय्या गोहेर,धिरज लोट,सचिन छजलाने,दिलिप महाराज,धिरज बैद,दिलिप सुर्यवंशी,पवन सेवक,संजय खरे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
