नगर प्रतिनिधी (दि.१९ जुन):-भगव्या पताका हाती घेऊन रथा समोर जय हरी विठ्ठलचा जयघोष करत चालणारे वारकरी…रथासोबत व मागोमाग दूर अंतरापर्यंत विठोबा रुखमाईचे नामस्मरण करत चाललेले वारकरी…
आणि सोबत विठ्ठल नामाने भक्तीमय झालेला परिसर हे डोळयाचे पारणे फेडणारे दृश्य म्हणजे विठुरायाच्या भेटीची ओढ असणाऱ्या वारकऱ्यांची दिंडी.पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दिंडी सोहळे पंढरपूर कडे प्रयाण करत आहेत. मालेगावहून सिद्धेश्वर महाराजांची दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.या दिंडीचे स्वागत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने गेल्या 44 वर्षापासून दरवर्षी करण्यात येते.यावर्षी देखील या दिंडीचे स्वागत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले.यावेळी वारकऱ्यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या जयघोषाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचा परिसर दुमदुमला होता तर संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.वारकऱ्यांच्या मुक्कामाची आणि भोजनाची व्यवस्था पोलिसांनी केली.वारकऱ्यांमध्ये पांडुरंग पाहून त्याची सेवा करून पोलिस पुण्याच काम करतात.दिंडीच्या स्वागतासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,पोसई/योगेश चाहेर,पोसई हंडाळ,सुरज देशमुख, जयसिंग शिंदे,चांगदेव आंधळे नंदू सांगळे,व पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
