सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ नर्सने घेतला गळफास
नगर प्रतिनिधी(दि.१९ जुन):- जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या(सिव्हिल) येथील नर्सिंग महिला वसतिगृहात नर्सने गळफास घेत आत्महत्या केली आहे.ही घटना शनिवार दि.१७ जुन रोजी रात्रीच्या सुमारास झाली आहे.ऋतीका पांडुरंग आंधळे (वय 19 मुळ रा.गिरेवाडी, ता.पाथर्डी,हल्ली रा.नर्सिंग वसतिगृह,जिल्हा रुग्णालय) असे आत्महत्या केलेल्या महिला नर्सचे नाव आहे.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या वसतिगृहातील रूम नंबर ७७ मध्ये ऋतीका पांडुरंग आंधळे या राहत होत्या.त्यांनी शनिवारी रात्री रूममध्येच दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.पोलीस अंमलदार मरकड यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.